Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सिद्धेश्वर परिसरातील इरिगेशन केनॉलवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर — सामाजिक कार्यकर्त्यांकडून सिंचन विभागाला निवेदन

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक मोहन दिपके

सिद्धेश्वर परिसर : इरिगेशन केनॉलवरील नव्या पुलाच्या सुरक्षेबाबत मोठी बेफिकिरी झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हाफिज जागीरदार यांनी सिंचन विभागास निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पुलावर कोणत्याही प्रकारची सेफ्टी पाईप किंवा प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


पुलावरील सुरक्षेअभावी जीवितधोक्याची शक्यता वाढली


निवेदनात नमूद केले आहे की, मोठ्या पुलाच्या काठावर सुरक्षेसाठी आवश्यक असलेली पाईपलाइन, लोखंडी ग्रील किंवा कोणतीही संरक्षणात्मक रचना बसवलेली नाही. खासकरून रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात वाहने पुलावरून जाताना मोठा जीवितधोका निर्माण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


पूर्वीच्या छोट्या पुलावर लोखंडी ग्रील बसवण्यात आली होती, मात्र नवा पूल बांधूनही ती व्यवस्था पुन्हा उभारली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.


सुरक्षा उपाययोजनांसाठी तातडीची मागणी


अब्दुल हाफिज जागीरदार यांनी प्रशासनाने लगेचच सेफ्टी पाईप, सुरक्षा ग्रील किंवा इतर उपाययोजना करून पुलावरील अपघाताचा धोका कमी करावा, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या जिवितसुरक्षेसाठी ही कार्यवाही अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.


निवेदन देणाऱ्यांची नावे व तक्रारीची प्रत संबंधित विभागांना या निवेदनावर हाफिज हादी जगिरदार आणि धम्मपाल दिलीप टायरे यांनी सही केली असून सिंचन विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच पोलिस निरीक्षक यांना प्रत पाठविण्यात आली आहे.


मुख्य मागण्या


मोठ्या पुलावर तातडीने योग्य सुरक्षा यंत्रणा बसवावी.


नवा व जुना दोन्ही पूल ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी सक्षम करावेत.


ग्रामस्थांच्या जीवितसुरक्षेसाठी प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा.






Post a Comment

0 Comments