वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
आनंद भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेन्शन
वेल्फेयर फेडरेशन, कसारा विभागाच्या माध्यमातून एका विधवा महिलेला न्याय मिळवून देण्यात आला आहे. मयत त्रिबंक भीमजी यांच्या पत्नी सुमनबाई त्रिबंक यांच्या फॅमिली पेन्शन खात्याला ,२०२५ मार्च पासून बँक ऑफ महाराष्ट्र, कसारा शाखेतून थकीत रक्कम जास्त असल्याने बंद करण्यात आले होते. यामुळे त्या मोठ्या अडचणीत सापडल्या होत्या.
या प्रकरणात फेडरेशनचे मार्गदर्शक आदरणीय गणेशन साहेब (सेवानिवृत्त कार्मिक अधिकारी) यांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे मुख्यालयाशी पत्रव्यवहार करून थकीत रक्कम दरमहा ६००० रुपयांप्रमाणे फॅमिली पेन्शनमधून कपात करून बाकी रक्कम अदा करण्याची विनंती केली. या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळून मागील महिन्यापासून सुमनबाई यांच्या फॅमिली पेन्शनची अंमलबजावणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची दखल घेणे आवश्यक आहे. मुंबई मंडळाचे
काॅ. जे. एन. पाटील – अध्यक्ष
काॅ. अरुण मनोरे – कार्यकारी अध्यक्ष
काॅ. आनंदा भालेराव – सचिव
काॅ. वसंत कासार – ऑर्गनायझेशन सेक्रेटरी
काॅ. नारायण सोनावणे – उपाध्यक्ष
तसेच कसारा शाखेचे
काॅ. प्रल्हाद खंदारे – शाखाध्यक्ष
काॅ. दिलीप शिंदे – ऑर्गनायझेशन सेक्रेटरी
आदी मान्यवरांनी सातत्याने पाठपुरावा करत एका दुर्दैवी विधवा महिलेला न्याय मिळवून देण्याचे काम केले.
या निर्णयामुळे कसारा विभागातील निवृत्त कामगारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून, त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी एक मजबूत संघटना त्यांच्या सोबत उभी आहे, असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
शेवटी, काॅ. वेणू पी. नायर, महामंत्री यांनी “जीके लाल सलाम… एनआरएमयु जिंदाबाद… ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन” असे म्हणत या प्रयत्नांचे कौतुक केले.



Post a Comment
0 Comments