Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सुकळीवीर येथील शक्तीपीठ महामार्गाच्या शेतजमिनीची पाहणी.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक : मोहन दिपके


हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सुकळीवीर येथील शक्तीपीठ महामार्गाच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गासाठी आवश्यक जमीन, प्रलंबित बाबी, मोजणी तसेच संबंधित कामांच्या प्रगतीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रशासनाला आवश्यक त्या सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.


त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी वारंगा फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील पायाभूत सुविधा, स्वच्छता, विद्यार्थी उपस्थिती, पोषण आहार व्यवस्था तसेच अध्यापनाची गुणवत्ता यांची पाहणी केली. शिक्षकांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला.



जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेऊन कामे गतीमान केली जातील, असे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी स्पष्ट केले.



Post a Comment

0 Comments