Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापन दिन जल्लोषात संपन्न

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहर गायकवाड

ठाण्यातील शिवाजी मैदानावर रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीचे अनोखे ऐक्य अनुभवायला मिळाले. २५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांनी या ऐक्याची पायाभरणी केली होती, याची आठवण कार्यक्रमात देण्यात आली.


कार्यक्रमादरम्यान शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती ही खुर्चीसाठी नसून सर्वसामान्यांच्या न्यायासाठी असल्याचे अधोरेखित करण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कोणत्याही अटी-शर्तीशिवाय ही युती स्वीकारली असून, कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हीच त्यांची एकमेव मागणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


दलित, वंचित, शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झालेली ही युती सत्तेसाठी नसल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्वोत्तम संविधानामुळे सामान्य घरातील माणसालाही सर्वोच्च स्थान मिळू शकते, यावर भाष्य करताना मुख्यमंत्री पदी बसता आले हे संविधानाचीच ताकद असल्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात केले.


इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या हस्ते बाबासाहेबांचा भव्य पुतळा लवकरच उभारला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.


या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर, ॲड. अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, संजीव बावधणकर, बाळासाहेब ओव्हाळ, सुनील वाघेकर यांसह रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments