![]() |
तीस वर्षांची परंपरा कायम; कामगारांनी पुन्हा दाखवला विश्वास |
आनंद भालेराव
कल्याण/ठाणे – कल्याण ठाणे इन्स्टिट्यूटमध्ये मागील तीस वर्षांची विजयी परंपरा कायम राखत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) ने भरघोस मतांनी विजय मिळवला.
काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री – मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या खंबीर नेतृत्वाखाली युवा आघाडी, महिला आघाडी आणि कल्याण समन्वय समितीने एकजुटीने केलेल्या कामाचा हा परिणाम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या विजयानिमित्त कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, " जो बोल रहे थे तागा पलटी-घोडे फरार, वो खुद फरार हो गये " असा टोला देखील कार्यकर्त्यांनी लगावला.
विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते
काॅ. रसिक मलबारी
काॅ. जे. एन. पाटील
काॅ. अरुण मनोरे
काॅ. सतिशन
काॅ. पनीकर
काॅ. सुहास देशमुख
काॅ. अमीत भगत
काॅ. अमीत इंगळे
आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन NRMU चे पॅनल विजयी केले.
सर्व धर्मसमभाव जपणाऱ्या युनियनवर कामगारांचा विश्वास
सर्व धर्म-समभावाचे मूल्य जपणारी एकमेव युनियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनवर कामगारांनी पुन्हा एकदा विश्वास टाकत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
युनियनकडून सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
काॅ. जे. एन. पाटील – अध्यक्ष, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन (मुंबई मंडळ)
काॅ. अरुण मनोरे – कार्यकारी अध्यक्ष, मुंबई मंडळ
काॅ. वसंत कासार – ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, मुंबई
काॅ. आनंदा भालेराव – सचिव, मुंबई मंडळ
काॅ. प्रल्हाद खंदारे – शाखा अध्यक्ष, कसारा
काॅ. दिलीप वेंखडे – सेक्रेटरी, कसारा
काॅ. दिलीप शिंदे – ऑर्गनाइज सेक्रेटरी, कसारा
काॅ. अशोक सोनावने – खजिनदार, कसारा
घोषणाबाजीने परिसर दुमदुमला👉
काॅ. वेणु पी. नायर यांच्या नावाचा लाल सलाम देत कार्यकर्त्यांनी
“एन आर एम यु जिन्दाबाद!”
“ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिन्दाबाद!”
असे नारे दिले.



Post a Comment
0 Comments