Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*“फॉरेन्सिक फ्रेन्झी” क्राईम सीन चॅलेंजमध्ये विधी महाविद्यालयीन विद्यार्थी बनले तपास अधिकारी*


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

मुंबई:

लाला लजपतराय विधी महाविद्यालयाने, अंजुमन-ए-इस्लाम्स बैरिस्टर ए.आर.अंतुले विधी महाविद्यालयाच्या सहकार्याने प्रथमच “फॉरेन्सिक फ्रेन्झी : इंटर-काॅलेजिएट क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन स्पर्धा” आयोजित केली. या मोहक स्पर्धेने संपूर्ण कॅम्पसला एक वास्तवदर्शी गुन्हेगारी घटनास्थळाचे स्वरूप दिले होते, ज्यामध्ये विविध विधी महाविद्यालयांमधील २५ संघ आणि ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.


स्पर्धेची सुरुवात उद्घाटन समारंभाने आणि विश्वस्त डॉक्टर सुनील गुप्ता यांच्या हस्ते रिबन कापून झाली. या प्रसंगी लाला लजपतराय शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. कमल गुुप्ता, व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. एच. जे. भसीन, फॉरेन्सिक तज्ज्ञ श्रीमती तितीक्षा देसाई, अकॅडमिक डीन डॉ. नीलम अरोरा, कॉमर्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हरमीत कौर भसीन, लाला लजपत राय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केवल उके आणि ए.आर. अंतुले विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. फलकनाझ दानिश शेख आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीत, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांचे सत्कार व भाषण यानंतर प्राचार्य डॉ. केवल उके यांनी भावी कायदेपंडितांसाठी फॉरेन्सिक कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट करणारे बीजभाषण केले.

काॅलेजच्या फाॅयरमध्ये उभारण्यात आलेल्या वास्तवदर्शी गुन्हेगारी घटनास्थळ तपासासाठी खुल खुले करन्यात आलीे. संघांना गटागटाने प्रवेश देण्यात आला. एका सदस्याने बॅरिकेडेड झोनमध्ये जाऊन पुराव्यांचे परीक्षण केले, तर उर्वरित सदस्यांनी बाहेरून सूचना देत मदत केली. त्यानंतर प्रत्येक संघाने फॉरेन्सिक अहवाल तयार केला आणि परीक्षक मंडळासमोर सादरीकरण केले.

या स्पर्धेत उत्कृष्ट निरीक्षण, तर्कशक्ती आणि फॉरेन्सिक कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन करणाऱ्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक लाला लजपतराय विधी महाविद्यालयाच्या जान्हवी खंदारे, तीषा जैन आणि प्रज्वल राऊत या विद्यार्थ्यांनी पटकावला. त्यांनी घटनास्थळाचे बारकाईने विश्लेषण करून अत्यंत अचूक फॉरेन्सिक अहवाल सादर केला. उपविजेते म्हणून जितेंद्र चव्हाण विधि महाविद्यालयाच्या संजना शाह, श्रुती धूत आणि हीर रावडिया या विद्यार्थिनींची निवड झाली. त्यांच्या संघानेही प्रभावी पद्धतीने पुराव्यांचे परीक्षण करून सुसंगत निष्कर्ष मांडले. दोन्ही संघांच्या कामगिरीचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले, कारण त्यांनी कायदेशीर विचार, तपास पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम साधला होता.

समारोप सत्रात प्रमाणपत्र वितरण, स्वयंसेवकांचे कौतुक आणि दोन्ही प्राचार्यांचे मार्गदर्शनपर संदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांना कायदा, तपास आणि फॉरेन्सिक विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ही एक आगळीवेगळी स्पर्धा ठरल्याचे सर्वांनी गौरवपूर्वक नमूद केले. 


कार्यक्रमाचे संचालन लाला लजपतराय विधी महाविद्यालयाच्या मूट कोर्ट सोसायटीचे मुख्य संयोजक शेरीन डिसोझा आणि संयोजक चीराग जैन यांनी केले. 


डॉ. केवल उके

प्राचार्य, लाला लजपत राय विधी महाविद्यालय, मुंबई, 




Post a Comment

0 Comments