वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण
जिंतूर तालुक्यातील हंडी येथे दिनांक 05 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्ष कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांनी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करत स्पष्ट केले की, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर आणि सर्व ताकदीने लढवणार आहे.
मेळाव्यात जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे, जिल्हा उपाध्यक्ष मुजफ्फर खान, उपाध्यक्ष मधुकर बनकर,जिल्हा कोषाध्यक्ष एन. जी. खंदारे, जिल्हा सदस्य बी. आर. आव्हाड, जिल्हा सल्लागार तुकाराम भारती, महिला जिल्हा अध्यक्ष सुनिता साळवे, माजी सरपंच गंगाधर कांगणे, युवा जिल्हा महासचिव सतीश वाकळे यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे ॲड. राजेंद्र भुतकर, भास्कर सुर्यवंशी, गणेश गाढे, भगवान चोरमारे, जनार्दन डोईफोडे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.


Post a Comment
0 Comments