Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सर्व वाहनधारकांकरिता अनिवार्य एचएसआरपी नंबर प्लेट; ३० नोव्हेंबरपर्यंत बदलणे बंधनकारक

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

सोशल मीडिया संपादक : मोहन दिपके

हिंगोली – केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार देशातील सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालयाने 04 व 06 डिसेंबर 2018 रोजी जारी केलेल्या अधिसूचनांनुसार 01 एप्रिल 2019 नंतर उत्पादित सर्व नवीन वाहनांना एचएसआरपी अनिवार्य आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आता 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवरही एचएसआरपी बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.


गुन्हे रोखण्यासाठी एचएसआरपी अत्यावश्यक – सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश

नंबर प्लेटमध्ये छेडछाड, नक्कल अथवा बनावट नंबर प्लेटमुळे वाढणारे गुन्हे रोखणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांवर एचएसआरपी लावणे अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


३० नोव्हेंबर २०२५ अंतिम मुदत – अनधिकृत नंबर प्लेट ठरणार दंडनीय

हिंगोली जिल्ह्यातील सर्व जुन्या वाहनधारकांनी सध्या वापरात असलेल्या नक्कल किंवा तत्सम नंबर प्लेट्स 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी बदलणे आवश्यक आहे. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी केवळ अधिकृत उत्पादकांकडून बसविण्यात आलेल्या एचएसआरपी प्लेट्सच वैध ठरणार असून, इतर अनधिकृत उत्पादकांकडील नंबर प्लेट्स मोटार वाहन कायद्यानुसार दंडनीय मानल्या जातील.


जिल्ह्यासाठी नियुक्त संस्था – बुकिंग ऑनलाइन

हिंगोली जिल्ह्यात एचएसआरपी बसविण्याचे काम एफटीए एचएसआरपी सोल्यूशन प्रा. लि. या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांसाठी एचएसआरपी बुकिंगसाठी अधिकृत पोर्टल https://mhhsrp.com येथे भेट द्यावी.


दर व सुविधा


दुचाकी / ट्रॅक्टर : 450 रुपये (जीएसटी वगळून)


तीनचाकी : 500 रुपये


चारचाकी व इतर वाहन : 745 रुपये


यासोबत घरपोच एचएसआरपी बसविण्याची सुविधा ऐच्छिक असल्याने, वाहनधारक इच्छित असल्यास त्यांच्या निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सेवा मिळू शकते. मात्र, अधिकृत फिटमेंट केंद्र सेवा नाकारू शकत नाहीत.


जिल्ह्यातील केंद्रे


हिंगोली : 5


कळमनुरी : 2


वसमत : 3


सेनगाव : 1



जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी अंतिम मुदतीपूर्वी आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments