वृत्यरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
प्रतिनिधी :- मिलिंदराज पंडित
एकदिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे उदघाटन, कॉ. राजू देसले ( राज्य सचिव आयटक व सह सचिव सी. पी. आय.) कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदिवासी ठाकर समाजाने वर्षानुवर्षे जतन केलेले. " कांबडी नृत्य "बोरली मधील जांबवाडी पाड्यातील बांधवांनी तसेच महिलांनी देखील नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या नंतर कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष उदघाटक प्रमुख अतिथी व प्रगतिशील लेखक संघ कार्यकारिणी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला वाहण्यात आली. आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनुवाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रगतिशील लेखक संघ इगतपुरी शाखेचे सचिव मा. पंढरी पगारे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. स्वागताध्यक्ष- मा. मच्छिंद्र चिमा भले मा. सरपंच बोरली यांनी आपल्या भाषणात भाऊक होत म्हणाले की, आमच्या आदिवासी पाड्यावर यायला धड रस्ता नाही तरी इतका त्रास सहन करुन किती मोठा जनसमुदाय आमच्या वेदना समजून घेण्यासाठी इथपर्यंत आला. याचे सर्व श्रेय प्रगतिशील लेखक संघ शाखा इगतपुरी यांना जाते.
पहिल्या सत्राचे सुत्र संचालन प्रगतिशील लेखक संघाचे तालुकाध्यक्ष मा. मिलिंदराज पंडित यांनी केले.
दुसऱ्या सत्राचे परिसंवादांचे अध्यक्ष कॉ. मा. महादेव खुडे यांनी आदिवासींच्या अर्वाचीन कालापासून ते आजवरचा इतिहास कथन केला. परिसंवादातील वक्ते मा. तुकाराम चौधरी यांनी आदिवासी जमात कशी या देशात मूलनिवासी आहे हे विचार मांडले , आदिवासी संस्कृती च्या अभ्यासिका प्रा. गंगा गवळी यांनी प्रस्थापित लेखक संपादक आदिवासी समाजातील लेखक, कवी यांना कसे डावलले जाते हि खंत व्यक्त केली. प्रगतिशील लेखक संघ राज्य सचिव मा. राकेश वानखेडे यांनी आदिवासी साहित्य सांस्कृतिक वर्चस्ववादाला कशा प्रकारे बळी पडले हे उदाहरण देऊन पटवून दिले.
परिसंवादाचे सुत्रसंचालन मा. सत्यवान वारघडे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात निमंत्रित काव्य संमेलन झाले. काव्य संमेलनाचे. अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक मा. डि. आर.पवार यांच्या अध्यक्षतेखाली व रानकवी ,तुकाराम धांडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.विविध जिल्ह्यातील कवी उपस्थित होते
कवी संमेलनाचे सुत्रसंचालन मा.विद्रोही कवी,मा.गणेश आहिरे यांनी केले .
या नंतर सर्व मान्यवर अतिथी तसेच सहभागी कवी यांना मायेची शाल,पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.
ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे इगतपुरी येथील आदिवासी साहित्य संमेलन,पाड्यावच्या जंगलात साहित्य संमेलन मध्ये ६० टक्के महिलांचा सहभाग विषेश आकर्षण आदिवासी कामडी नृत्य आणि चांदावरच्या पानावरील मिष्टान्न भोजन .गायक तुकाराम पवार यांनी आपल्या पहाडी आवाजात गीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.



Post a Comment
0 Comments