वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
{संपादकीय}
शहापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आठवडी बाजारातील अव्यवस्था, वाहन पार्किंगची समस्या व ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर बाजार समिती प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली.
आठवडी बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी तसेच ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय बाजार समितीकडून करण्यात आली आहे. तरीही रस्त्यावर वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. बाजार परिसरात नियमांचे पालन व्हावे यासाठी विविध ठिकाणी जनजागृतीचे बॅनरही लावण्यात येणार आहेत.
या बैठकीस शहापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक मुकेश ढगे, राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक उबाळे, समितीचे सभापती नंदकुमार डोहळे, उपसभापती शरद वेखंडे, संचालक वामन गायकर, संचालक किशोर दिवाणे, प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे, गोठेघर सरपंच गणेश कामडी, वाफे ग्रामपंचायत सदस्य डोंगरे, कळंबे उपसरपंच अविनाश किरपण, प्रहार सचिव विनायक बोद्रें, सल्लागार रामचंद्र मडके, घनश्याम परदेशी, युवा संघटक मयुर किरपण, युवा सहसचिव निलेश बोटंकोडळे तसेच बाजार समितीचे सचिव रविंद्र चौधरी, निरीक्षक श्याम अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments