वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण
परभणी : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष बलात्कार व हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर कृत्याच्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा जलद गतीने निकाल लावावा, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीच्या (वंचित बहुआ) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, डोंगराळे गावातील चार वर्षांच्या लहान मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या हा मानवी मूल्यांना काळीमा फासणारा आणि अत्यंत संतापजनक प्रकार आहे. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत आणि विद्यमान कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. तसेच प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी.
पीडित कुटुंबाला तातडीची शासकीय आर्थिक मदत देण्याची, प्रकरणात सरकारी विशेष वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची, तसेच पीडित परिवाराला संपूर्ण सुरक्षा पुरविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी कठोर कायदे करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही भूमिका निवेदनात मांडण्यात आली.
या निवेदनावर उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता ताई साळवे, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे, परभणी महानगर अध्यक्ष मुदस्सर असरार, जिल्हा सचिव भगवान देवरे, श्रीरंग पंडित (जिल्हा उपाध्यक्ष), मधुकर बनकर (जिल्हा उपाध्यक्ष), अशोक वायवळ (जिल्हा उपाध्यक्ष), एन. जी. खंदारे (कोषाध्यक्ष), धम्मपाल सोनटक्के (जिल्हा संघटक), संदीप खाडे (प्रसिद्धी प्रमुख), सतीश वाकळे (युवक जिल्हा महासचिव), प्रमोद अंभोरे (ता. अध्यक्ष उत्तर), कमलेश ठेंगे (ता. अध्यक्ष दक्षिण), मुंजा देवरे (युवक जिल्हा उपाध्यक्ष), प्रताप पंडित (युवक जिल्हा कोषाध्यक्ष), प्रा. बालासाहेब गाढे (युवक जिल्हा सचिव), यशवंत सोनवणे (तालुका महासचिव), अमोल वाघमारे (महानगर उपाध्यक्ष), राहुल पवळे (तालुका उपाध्यक्ष), सुनील सोनवळे (तालुका उपाध्यक्ष), भारतनंद (तालुका कोषाध्यक्ष), तसेच सुनिता पांचा, कुसुम कनकुटे, अॅड. प्रतिमा चंद्रमोरे, आशा सावंत, अश्विनी सांगळे, सुमित्रा कदम, रेखा पंडित, वेणूताई गायकवाड, मंदा वाघमारे, संगीता प्रधान, पार्वती प्रधान, अन्नपूर्णा मोरे, बायनाबाई डंबाळे, विजयमाला कांबळे, चंद्रकला साळवे आदी पदाधिकारी व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment
0 Comments