वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️📍
सावरोली (प्रतिनिधी):शंकर गायकवाड
गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेले कुत्तरकुंड धरणाचे काम अखेर पुन्हा सुरू होणार आहे. या धरणामुळे परिसरातील अनेक गावांना शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता होणार असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या धरणातून नाणी नदी प्रवाहित होते आणि गांगणवाडी, हिरवाचिवाडी, वडाचीवाडी, झापवाडी, सावरोली, सोनांदगाव आदी गावांतील नागरिकांना व शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
काम सुरू झाल्यानंतर काही काळ या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते, मात्र काही कारणास्तव काम थांबले होते. अखेर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज पुन्हा एकदा शासकीय अधिकाऱ्यांनी धरण स्थळाची पाहणी केली.
या वेळी उपस्थित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “धरणाचे अपूर्ण राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सावरोली तसेच पाणीपुरवठा समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. जगन दवणे यांनी धरणातील वाहते पाणी बंद करून अधिकाऱ्यांसमवेत स्थळ पाहणी केली. त्यांच्या या पुढाकारामुळे लवकरच धरणाचे काम सुरू होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत असून, परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.


Post a Comment
0 Comments