वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
बाळकृष्ण सोनावणे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत विद्या प्रसारक मंडळ, किन्हवली (ता. शहापूर) येथील शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रिया सतीश भालेराव हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून गौरव मिळवला.
कु. प्रिया भालेराव ही शहा विद्यालयात १२वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. राज्यभरातून विविध स्पर्धक सहभागी झालेल्या आणि बारामती येथे झालेल्या या शासकीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तिने आपले कौशल्य सिद्ध केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक जी. एच. वेखंडे सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके मॅडम यांच्या हस्ते प्रिया, तिचे पालक सतीश भालेराव, प्रशिक्षक शाहरुख पठाण आणि मार्गदर्शक डॉ. कोळी सर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रियाच्या या यशाचे किन्हवली पंचक्रोशीसह शहापूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून, आगामी स्पर्धांसाठी तिच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.


Post a Comment
0 Comments