वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
शंकर गायकवाड
किन्हवली – शहा चंदुलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी “भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी गौरव दिन” अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक जी. एच. वेखंडे सर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अॅड. प्रेषित प्रभाकर जयवंत, सामाजिक कार्यकर्ते, केंद्रीय सेंसर बोर्ड सदस्य तसेच भारत विकास अभिमान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मुंबई हे उपस्थित होते. त्यांच्यासह प्रकाश लसणे (अनुलोम प्रमुख, भिवंडी), राजेश पठारे, अभिराज शिंदे, पर्यवेक्षक एस. जी. निळे सर, सांस्कृतिक प्रमुख श्रीमती अर्चना देसले मॅडम, जेष्ठ शिक्षिका सौ. हरड मॅडम, ज्युनिअर विभागाच्या सौ. जाधव मॅडम, जेष्ठ शिक्षक ए. डी. लहासे सर व डॉ. कोळी सर व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘घर घर संविधान’ या उपक्रमाअंतर्गत ज्युनिअर विभागातील इतिहास विषयाच्या प्राध्यापिका सौ. अरुणा जाधव मॅडम यांच्या मनोगताने झाली. त्यांनी संविधान आपल्याला अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या शिकवते, हे स्पष्ट केले.
प्रमुख वक्ते अॅड. प्रेषित प्रभाकर जाधव यांनी भारतीय संविधानातील विविध कलमांची माहिती, तसेच नागरिकांनी कोणत्या अधिकारासाठी कोणते कलम वापरावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनामनात दृढपणे रुजले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्याचबरोबर व्यासपीठावरील नारीशक्ती – सौ. हरड मॅडम, सौ. जाधव मॅडम व श्रीमती अर्चना देसले मॅडम – यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जी. एच. वेखंडे सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीतील योगदान आणि भारतीय संविधान जगातील महान संविधान म्हणून का ओळखले जाते, याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले. “संविधान अधिक बळकट करणे हाच ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा मुख्य हेतू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाने झाला. विद्यालयातील तब्बल २२०० विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाला भव्यता प्राप्त करून दिली. त्यानंतर राष्ट्रीय गीताने कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डी. जे. फर्डे सर, व्ही. व्ही. फर्डे सर, बी. डी. वरकुटे सर, एस. एन. भोईर सर, डी. के. विशे सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पी. आर. बांगर सर यांनी केले.





Post a Comment
0 Comments