Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

परप्रांतीय रिक्षाचालकाचा माज उतरला; मनसे नेत्यांना शिवीगाळ करणारा २४ तासांत पोलिस ठाण्यात जाऊन कान धरून मागतोय माफी

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

ठाणे जिल्हा प्रतिनिधी मनोहर गायकवाड


ठाणे – मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी–परप्रांतीय वादाची प्रकरणं वाढत असताना ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


शैलेंद्र संतोष यादव असे या रिक्षाचालकाचे नाव असून किरकोळ कारणावरून त्याचा एका मराठी तरुणाशी वाद झाला. या वादातूनच भांडण वाढत गेले आणि संतापाच्या भरात यादवने राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्या संदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. हा संपूर्ण प्रकार मोबाइलवर चित्रीत होऊन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरला. व्हिडीओ पाहताच मनसैनिकांमध्ये संताप उसळला.


तणाव वाढू लागल्यानंतर अवघ्या २४ तासांत शैलेंद्र यादवने पोलिस ठाण्यात हजेरी लावत शरणागती पत्करली. दारूच्या नशेत असल्याने चुकीचे शब्द तोंडातून निघाल्याचे कबूल करत त्याने हात जोडून माफी मागितली. “माझ्या तोंडातून अपशब्द निघाले, मी घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतो, पुढे अशी चूक करणार नाही,” असे सांगत त्याने पोलिस ठाण्यातच कान धरून उठाबशा मारत पश्चात्ताप व्यक्त केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


दरम्यान, या प्रकरणावर मनसैनिकांचा रोष अद्याप शमलेला नाही. आरोपी रिक्षाचालकाला ‘मनसे स्टाईल’ शिक्षा द्यावी, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली आहे. परिसरातील तणाव लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



Post a Comment

0 Comments