Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

**उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार; चार माजी नगरसेवक टीम ओमी कलानी मध्ये दाखल! ‘ओमी पप्पू कलानी पॅटर्न’ची जोरदार चर्चा**

 



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

उल्हासनगर: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने राजकीय हलचालींना वेग आला असून उल्हासनगरात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. भाजपमध्ये राज्यभर ‘इनकमिंग’ सुरू असताना उल्हासनगरमध्ये मात्र भाजपचे चार प्रभावी माजी नगरसेवकांनी पक्षाला धक्का देत Team Omi Kalani (TOK) मध्ये प्रवेश केला आहे.


भाजपचे मुख्य आधारस्तंभ मानले जाणारे माजी नगरसेवक जमनु पुरसवाणी, महेश सुखरामानी, प्रकाश माखिजा, राम (चार्ली) पारवानी यांनी अधिकृतरीत्या टीओके मध्ये प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गोपाळराव लांडगे, ओमी कलानी, पंचम कलानी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


या घडामोडीनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्ये एकच चर्चा—

"आता उल्हासनगरमध्ये ओमी कलानी पॅटर्न सुरू झाला!"


भाजपमधील या मोठ्या फटीमुळे आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

0 Comments