Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

खर्डी–वाडा रस्ता लवकरच मार्गी लागणार; आमदार दौलत दरोडा यांचे मार्च 2026 पर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन

 




शहापूर | प्रतिनिधी

खर्डी ते वाडा या अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्याबाबत मागील दहा दिवसांपूर्वी युवा तालुका अध्यक्ष दिपकेश उबाळे यांना माहिती मिळाली होती. सदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्यांनी सविस्तर माहिती संकलित करून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ठामपणे आवाज उठवला होता. यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले गेले.

त्याच अनुषंगाने आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने खर्डी–वाडा रस्ता बांधणी संदर्भात शहापूर तालुक्याचे आमदार मा. श्री दौलतजी दरोडा साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रस्त्याच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेदरम्यान आमदार दौलत दरोडा साहेब यांनी मार्च 2026 मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदन देताना रवींद्र जाधव (शहापूर तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन सेना), विकास अभंग (तालुका नेते), मनोज जाधव (तालुका उपाध्यक्ष), शाहिद शेख (तालुका अध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग) तसेच दिपकेश उबाळे (युवा तालुका अध्यक्ष) उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments