वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर | प्रतिनिधी
खर्डी येथील रहिवासी अजय कलीराम बहोत यांनी त्यांच्या पाल्याच्या शाळेतील अडचणींबाबत शहापूर तालुका नेते विकास राजेंद्र अभंग यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यांचा मुलगा यश अजय बहोत हा मॉडर्न इंग्लिश स्कूल, खर्डी येथे शिक्षण घेत असून, शाळेत होणारा दूजाभाव, तसेच उत्कृष्ट विद्यार्थी असतानाही शिक्षकांकडून होणारे दुर्लक्ष अशा गंभीर समस्या त्यांनी मांडल्या होत्या.
या तक्रारीची दखल घेत दिनांक 22 डिसेंबर 2025 (सोमवार) रोजी रिपब्लिकन सेना शहापूर तालुका कमिटी, पत्रकार वर्ग व इतर कार्यकर्त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक यांची भेट घेतली. अत्यंत समंजसपणे व सकारात्मक चर्चेद्वारे सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला. या भेटीनंतर विद्यार्थ्याशी संबंधित समस्या समाधानकारकरीत्या मार्गी लागल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर अजय कलीराम बहोत यांनी एक आभारपत्र लिहून रिपब्लिकन सेना शहापूर तालुका पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या वेळी उपस्थित पदाधिकारी व मान्यवर:
रविंद्र जाधव – शहापूर तालुका अध्यक्ष
विकास अभंग – शहापूर तालुका नेते
मनोज जाधव – शहापूर तालुका उपाध्यक्ष
शाहिद शेख – शहापूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष
दीपकेश उबाळे – शहापूर तालुका युवा अध्यक्ष
अनंता भोईर – पत्रकार
अर्जुन जाधव – पत्रकार
तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी रिपब्लिकन सेनेने दाखविलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments