वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
आनंदा भालेराव
लखनऊ (उत्तरप्रदेश) -ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन (AIRF) चे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे दि. 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे पार पडले. या अधिवेशनात देशातील सोळा रेल्वे झोनमधील रेल्वे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कामगारांमधील युनियनची एकता दाखवणे, कामगार कायद्यात करण्यात आलेल्या बदलांना विरोध, आठवे वेतन आयोग तात्काळ लागू करणे, तसेच कामगारविरोधी काळे कायदे रद्द करावेत या प्रमुख मागण्यांवर अधिवेशनात ठाम भूमिका मांडण्यात आली.
या अधिवेशनास एन.आर.एम.यू.चे मुख्यालय प्रतिनिधी काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे / सहायक महामंत्री AIRF), काॅ. रसीक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय), काॅ. व्ही. आनंदन (महामंत्री, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन) यांच्यासह मध्य रेल्वे व कोकण रेल्वेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान “काॅ. वेणु पी. नायर जी को लाल सलाम”, “रेड टायगर आगे बढो – हम तुम्हारे साथ है”, “दुनियाके मजदूर एक हो” अशा घोषणांनी लखनऊ परिसर दणाणून गेला.
या अधिवेशनातून केंद्र सरकारने कामगारांच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, असा ठाम संदेश देण्यात आला.




Post a Comment
0 Comments