Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

घरफोडी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास ४८ तासाच्या आत सुरत राज्य- गुजरात येथुन अटक करून गुन्हा उघडकीस आमण्यास तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 
शंकर गायकवाड

तुळींज पोलीस ठाणे हद्दीत दि.१७.१२.२०१५ रोजी दुपारी १२.३० ते ०२.३० वा. च्या दरम्यान रु.नं. एफ. १० नालंदा अपार्टमेंट महेश पार्क नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर येथील रुमचा कड़ी कोयंडा तोडुन रूम मध्ये प्रवेश करुन लोखंडी कपाटात ठेवलेले ४,४०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी केलेवरून फिर्यादी नामे सौ. अपर्णा संदीप शेलार वय ३५ वर्षे, व्यवसाय गृहीणी रा. रु .नं. एफ १०, नालंदा अपार्टमेन्ट, महेश पार्क, तुळींज रोड, नालासोपारा पूर्व ता.वसई जि.पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाणे गु.रजी.नं. ८५०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता,


सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन, मा. वरिष्ठांनी अज्ञात आरोपीत निष्पन्न करून त्यांचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. तपासा दरम्यान घटनास्थळाची पाहणी करून, घटनास्थळाशेजारील तसेच आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केले असता, घटनेच्या वेळी एक पुरुष, एक महिला ०२ मूले हे फिर्यादी राहत असलेले सोसायटीमध्ये गेल्याचे बाहेर आल्याचे दिसत असल्याने, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण करार आरोपीत नामे संतोष सुनील जाटप वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. कातकरी पाडा, सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे, विरार पूर्व ता.वसई, जि.पालघर सध्या रा. हरी दर्शन ४२४ ए-४२४ शेखपुर, कामरेज सुरत यास हरिदर्शन सोसायटी कामरेज सुरत येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याची पत्नी नामें सौ. गीता संतोष जाटप वय ४० वर्षे रा. वरील प्रमाणे यांचेसह मिळून केल्याचे कबुल केल्याने, नमुद दोन्ही आरोपीत यांना दिनांक २०.१२.२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीत यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुददेमालापैकी एकुण २,८६,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.


सदरची कामगीरी सौ. पोर्णिमा चौगुले श्रीगी पोलीस उपआयुक्त सही परीमंडळ-२ वसई, श्री. उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त सो.तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे परिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय जाधव सो, पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बनकर सो, पोलीस निरीक्षक (प्रशासन)-आनंद पेडणेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोहवा-१२०३१ अशपाक जमादार, पोहया-१२०६२ पांडुरंग केंद्रे, पोहवा-१२०६५ डिगांबर परजने, पोहया-१३०५२ इस्माईल शाह छपरीधन, पोहवा-१४१५४ राहुल कदम, पोलीस अंमलदार-२३२६३ प्रसाद पालवे, पोलीस अंमलदार-२३२६६ प्रकाश दवणे,पोलीस अंमलदार-२३२७१ ज्योतीराज झांजे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



Post a Comment

0 Comments