वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी – शंकर गायकवाड
आसनगाव :महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचशील मित्र मंडळ आसनगाव यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. आसनगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना बिस्कीट व पाण्याच्या बॉटलचे वाटप करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमात बहुजन समाज पार्टी शहापूर विधानसभा अध्यक्ष गुरुनाथ लोखंडे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच श्रेयस मोबाईल शॉपचे मालक सुधाकर संगारे, रुपेश घायवट, विजय सोस्टे, सुरज घनगाव, कुणाल गायकवाड, श्रीकांत गायकवाड, जयदीप मुठे, गौरव इंगोले व इतर मान्यवर व स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचशील मित्र मंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. सामाजिक कार्याची ही परंपरा पुढील काळातही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments