वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
बदलापूर
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 08 डिसेंबर 2025, सोमवार रोजी सकाळी 11 वाजता कुळगांव-बदलापूर नगरपरिषद कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेली समाज बदलापूर सेवा यांच्या पुढाकाराने आणि मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड साहेब व नगरपरिषद अधिकारी श्री सिद्धार्थ पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शुभारंभास मान्यवर श्री मा. शरदजी तेली साहेब, श्री नंदु जाधव (पंचकुष्ठी नामांकित बुवा) तसेच श्री हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तेली समाजातील मान्यवर श्री अविनाश खिलारे, श्री नितीन लांजेकर, श्री कुणाल देशमाने, श्री अशोक रहाटे यांसह समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहवर्धक वातावरण लाभले.
कार्यक्रमात संताजी जगनाडे महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या समाजोद्धाराच्या विचारांना उजाळा देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी समाज ऐक्य, बंधुता आणि सेवाभाव यावर मार्गदर्शन करत प्रसंगी समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाची सांगता सर्वांनी संताजी महाराजांच्या चरणी वंदन करून करण्यात आली. शेवटी उपस्थित सर्व समाजबांधवांनी क्षणचित्रे घेऊन या ऐतिहासिक क्षणांची नोंद सदैव स्मरणात ठेवली.


Post a Comment
0 Comments