Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अस्नोली शाळेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शंकर गायकवाड

अस्नोली : केंद्रीय शिक्षण मंडळाकडून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी देशभरात उद्या पार पडणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्साहात तयारी केली असून, यासाठी अस्नोली शाळेत ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच शिक्षकवर्ग उपस्थित राहून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


या महत्त्वपूर्ण परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेत छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अभ्यासातील मेहनत, वेळेचे व्यवस्थापन आणि शांत मनाने प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सल्ला दिला.


कार्यक्रमाचा समारोप करताना शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकवर्गांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत परीक्षेत उत्तम यश मिळवावे अशी कामना व्यक्त केली.

उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक आणि मान्यवरांच्या सहभागाबद्दल शाळा प्रशासनाकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



Post a Comment

0 Comments