वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
आनंदा भालेराव
टिटवाळा – दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रिक्षा चालक/मालक असोसिएशन मांडा–टिटवाळा विभागाचे अध्यक्ष आदरणीय बाळा (नाना) भोईर यांचा वाढदिवस रिक्षा असोसिएशन कार्यालय, टिटवाळा स्टेशन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयु. एन. के. सोनावने, आयु. जयवंत वाघमारे, दिलीप वेंखडे तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात उपस्थित रिक्षा चालक व मालक बांधवांना संबोधित करताना अध्यक्षांनी सांगितले की,
“प्रवाशांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची जबाबदारी सर्वांनी पाळावी. नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे सेवा देणे हीच आमची ओळख आहे.”
शुभेच्छा व सदिच्छांच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जय महाराष्ट्र रिक्षा असोसिएशन.


Post a Comment
0 Comments