वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मोहन दिपके
मौजे दुघाळा ता. औंढा (नाग) गावामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून हिंदू समाजाच्या स्मशानभूमी चा प्रश्न प्रलंबित होता. आणी त्यामुळे पावसामध्ये कुनाचा मृत्यू झाल्यास नागरिकांची हेळसांड होत होती व मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
सदरची बाब लक्षात घेऊन दुघाळा गावचे युवा सरपंच जगदिप वसंतराव दिपके यांनी स्मशानभूमी साठी आमदार निधी व खासदार निधी मधुन निधी मिळत नसल्याने व इत्तर योजनेतून शासनाकडे पाठपुरावा करून देखिल निधी उपलब्ध होत नसल्याने सदर काम स्वखर्चातून करावयाचे ठरवले व त्यासाठी दोन गुंठे जागा खरेदी करून आज रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आसुन सदर कामाचे भूमिपूजन गावातील श्रिधर फकीरराव गडदे महाराज यांच्या हस्ते केले आहे. सदरची स्मशानभूमी चे काम हे अतिशय चांगल्या दर्जाचे करून याठिकाणी चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करून वृक्षलागवड करून या ठिकाणी बोअरवेल घेऊन पाणी उपलब्ध करणार असुन या कामासाठी किमान १२ लक्ष रूपये खर्च येणार असुन सदरचा सर्व खर्च हा आम्ही स्वतः करत आहोत असे सरपंच जगदिप वसंतराव दिपके यांनी सांगितले आहे.
सदर काम करण्यासाठी श्रिधर फकीरराव गडदे महाराज, उपसरपंच विलास उत्तमराव राठोड, ग्रा.पं. सदस्य अशोक दादाराव बिरगड, गजानन पुंजाजी ढोके, किसन लक्ष्मण राठोड, सय्यद हयात सय्यद महेबुब यांचे मोलाचे सहकार्य झाले असल्याचे जगदिप वसंतराव दिपके यांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments