वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर : शंकर गायकवाड
शहापूर व मुरबाड तालुक्यातील भात खरेदी केंद्र सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून सुरळीतपणे सुरू राहणार असल्याची माहिती सावरोली भात खरेदी केंद्राचे अधिकारी पाटील यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून भात खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती. यासंदर्भात डॉ. तरुलता धनके यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीनुसार बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सावरोली सो. भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे केंद्र तात्पुरते बंद ठेवावे लागले.
त्यानंतर शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी कृषी बाजार समिती शहापूरचे संचालक सुनील धनके यांच्या नांदगाव सो. येथील ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. सर्व बाबी लक्षात घेऊन टोकन पद्धतीने भात खरेदी सुरू करण्यात आली असून, एकावेळी १०० शेतकऱ्यांना टोकन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही अधिकारी पाटील यांनी दिली.
दरम्यान, वृत्तरत्न नव महाराष्ट्रचे शहापूर प्रतिनिधी शंकर गायकवाड यांनी शहापूर व मुरबाड तालुक्यातील इतर भात खरेदी केंद्रांबाबत माहिती विचारली असता, अधिकारी पाटील यांनी सांगितले की सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून दोन्ही तालुक्यांतील सर्व भात खरेदी केंद्रे कोकण पद्धतीने सुरू होणार आहेत.
शहापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्रे :
1. सावरोली सो.
2. मुगाव
3. पिवळी
4. आडगाव
5. डोलखांब
मुरबाड तालुक्यातील भात खरेदी केंद्रे :
1. धसई
2. माळ
3. पाडगाव पठार
या सर्व केंद्रांवर भात खरेदी सुरळीतपणे होणार असून, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी खात्रीही अधिकारी पाटील यांनी दिली आहे.


Post a Comment
0 Comments