वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
अंबड (जि. जालना) :यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर — बौद्धाचार्यांचे जनक व चैत्यभूमीचे शिल्पकार — यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त अंबड तालुक्यातील मौजे ताड हादगाव येथे एकदिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भैय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा, जालना जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयुष्यमान महेंद्र बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आयुष्यमान भास्करराव साळवे यांनी प्रभावीपणे केले.
समता सैनिक दलास प्रशिक्षण देण्यासाठी जालना येथून आलेले लेफ्टनंट कर्नल कुणाल दहिवले यांनी उपस्थितांना समता सैनिक दलाचा इतिहास सविस्तरपणे समजावून सांगितला. तसेच सैनिकांच्या शिस्त, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले. या शिबिरात १३ पुरुषांनी समता सैनिक दलात सहभाग नोंदवला. प्रारंभी समता सैनिक दलाच्या ध्वजारोहणानंतर मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमात जालना जिल्हा महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योतीताई खरात यांनी मार्गदर्शन केले. जालना जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम कोळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, अंबड तालुका अध्यक्ष आयुष्यमान उत्तमराव येडे होते.
याप्रसंगी तालुका सरचिटणीस डॉ. राहुल बागुल, तालुका संरक्षण उपाध्यक्ष विनोद जाधव, संरक्षण सचिव विशाल रामदास वाढवे, बौद्धाचार्य तथा जिल्हा संस्कार सचिव भीमराव बनसोडे उपस्थित होते. तसेच मौजे ताड हादगाव येथील सरपंच शारदाताई वाघमारे, घनसावंगी तालुका अध्यक्ष राजकुमार खरात, आयुष्यमान भावनाताई दिलपाक, सुभाष पाराजी जाधव (तळेगाव), अरुण नारायण खंडागळे (पानेवाडी), बौद्धाचार्य सचिन मानेपुरी हिवाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुष्यमान प्रकाशजी वाघमारे, एकनाथ वाघमारे, बाळू ससाणे सर, प्रकाश ससाणे, सर्जेराव ससाणे, बाबासाहेब वाघमारे, विकास वाघमारे, विनोद ससाणे, नितीन ससाणे, विशाल ससाणे, सुजल वाघमारे, विशाल खळगे, नानासाहेब वाघमारे, रवी ससाणे तसेच समस्त बौद्ध उपासक-उपासिका, ताडगाव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सरनाय गाथेने करण्यात आली.


Post a Comment
0 Comments