वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
कल्याण पूर्व | दि. १६ डिसेंबर २०२५
कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरातील गणेश विद्या मंदिर शाळेतील एका विद्यार्थिनीचे दहावीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क रिपब्लिकन सेनेच्या (Republican Sena) मध्यस्थीने माफ करण्यात आले आहे. शाळेच्या या निर्णयामुळे गरजू विद्यार्थिनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित विद्यार्थिनी सध्या इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुलीचे शिक्षण सुरू ठेवणे पालकांसाठी कठीण झाले होते. ही बाब रिपब्लिकन सेनेच्या निदर्शनास येताच संघटनेने तातडीने शाळेच्या संचालक मंडळाशी संपर्क साधत विद्यार्थिनीच्या दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्क माफीची मागणी केली.
रिपब्लिकन सेनेच्या या मानवीय मागणीला गणेश विद्या मंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थिनीचे दहावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. शाळेने विद्यार्थिनीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थिनीच्या पालकांनी रिपब्लिकन सेनेचे तसेच शाळा व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या वेळी रिपब्लिकन सेनेच्या ठाणे जिल्हा प्रभारी मायाताई कांबळे, ज्येष्ठ नेत्या सुशिलाताई डोळस, संगीताताई स्वामी, प्राची पवार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments