वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मुंबई | दि. १५ डिसेंबर २०२५
आनंदा भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळ यांच्या वतीने आज दिनांक १५/१२/२०२५ रोजी दरवर्षीप्रमाणे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांच्या अध्यक्षतेखाली पेंशन अदालत आयोजित करण्यात आली.
या अदालतीत मुंबई मंडळातील श्रिमती लिलाबाई निकाळे यांची फॅमिली पेंशन योजना जून २०२५ पासून बंद करण्यात आल्याचा विषय मांडण्यात आला. त्यांच्या मयत पतीच्या नावामध्ये पीपीओ कॉपीत तफावत असल्याचे कारण देत पेंशन थांबविण्यात आली होती. या प्रकरणात आदरणीय गणेशन साहेब (माजी कार्मिक अधिकारी) यांनी सविस्तर व व्यवस्थित पत्र तयार करून ते पेंशन अदालतीत तक्रार निवारणासाठी सादर केले.
प्रशासनाने सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर श्रिमती लिलाबाई निकाळे यांची फॅमिली पेंशन योजना डिसेंबर २०२५ पासून मागील थकबाकीसह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही यशस्वी कार्यवाही काॅ. वेणु पी. नायर, महामंत्री (मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या खंबीर नेतृत्वाखाली तसेच काॅ. व्ही. आनंदन (महामंत्री, मुख्यालय), काॅ. रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय), काॅ. भोसले (खजिनदार, मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मुंबई मंडळातून काॅ. आनंदा भालेराव (सचिव), काॅ. के. आर. गोयल (खजिनदार), काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कल्याण विभाग), काॅ. राजू जगताप (अध्यक्ष, कर्जत-नेरळ शाखा) यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी काॅ. वेणु पी. नायर यांना “जीके लाल सलाम”, “एनआरएमयू जिंदाबाद” व “ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद” अशा घोषणांनी अभिवादन केले.



Post a Comment
0 Comments