वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कल्याण
युथ ॲक्शन फॉर सोशल अव्हेरनेस अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी (YASDA) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, *ॲड. डॉ. केवलजी. उके सर* यांच्या मार्गदर्शनाखाली २५ वर्षीय युवती अशना शेट्टी हिने आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
अशना हिने आपला २५ वा वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी साजरा करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शशांक माध्यमिक विद्यालय, वाडेघर, कल्याण (पूर्व) येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या. सध्या सुरू असलेल्या सराव परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या पारदर्शक रायटिंग पॅड्स अशना हिने आपल्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिले.
याच दिवशी संस्थेचे जुने जाणते जेष्ठ समाजसेवक आयु. शशिकांत वाघ (आण्णा) यांचा देखील वाढदिवस होता. काही कारणास्तव ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक फुटी पट्टी व पेन भेट स्वरूपात पाठवून आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास अशना शेट्टी, तिचे वडील एकनंदा शेट्टी, संस्थेचे पदाधिकारी शशिकांत खंडागळे, बंदिश सोनावने, तसेच शशांक माध्यमिक विद्यालयाच्या *मुख्याध्यापिका वैशाली पाटील मॅडम आवर्जून उपस्थित होत्या.* विद्यालयाचा संपूर्ण शिक्षकवर्ग उपस्थित असून वामन मस्के सरांचे विशेष योगदान या उपक्रमाला लाभले.
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी वर्गाने *अशना शेट्टी व आयु. शशिकांत वाघ (आण्णा) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.* सामाजिक जाणीव जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले हे योगदान उपस्थितांकडून विशेष कौतुकास्पद ठरले. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.






Post a Comment
0 Comments