वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
प्रतिनिधी-शंकर गायकवाड
सावद गाव-तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील प्रियांका सुरेश जाधव यांनी C.A. (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यात आली.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण तालुका उपाध्यक्ष सुभाष पंडित, माजी संघटक संजय भालेराव तसेच वासुंदरी गावाचे माजी उपसरपंच दिपक कांबळे उपस्थित होते. मान्यवरांनी प्रियांका जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातून उच्च शिक्षणात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून प्रियांकाच्या या यशामुळे गावाचा नावलौकिक वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments