Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

६ डिसेंबर : महात्मा फुले स्मृतीदिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘एक वही – एक पेन’ संकल्पदिवसाचे आयोजन

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर, दि. ६ डिसेंबर २०२५ :

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त तसेच मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून पंचशील नवयुवक मंडळ व बहुद्देशीय संस्था, जनूना यांच्या वतीने ‘एक वही – एक पेन’ हा संकल्पदिवस साजरा करण्यात आला.


आज सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वंदना घेण्यात आली. त्यानंतर अभिवादन चौक येथे पुढील कार्यक्रम पार पडला. संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाचा हक्क, मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, स्त्रियांना अधिकार बजावण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पंचायत समिती सदस्य श्री लक्ष्मण भाऊ हरमकार होते. ज्येष्ठ नागरिक देवदास काका हरमकार, ज्येष्ठ नागरिक विठोबा जी उखर्डा, देवानंद जी शेजव, मा. सरपंच सुडोकर ताई, महेशजी हटकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री मनसुटे सर यांनी केले.


माननीय सुनील भाऊ हेलोडे यांनी शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना नवी चेतना देण्याचे आवाहन केले. तर संदीप गोरे यांनी समाजकार्य आणि गावाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर अध्यक्ष लक्ष्मण हरमकार आणि व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गावातील मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


२३२ विद्यार्थ्यांना ‘एक वही – एक पेन’ वितरण

पंचशील नवयुवक क्रीडा व बहुद्देशीय संस्थेतर्फे २३२ विद्यार्थ्यांना ‘एक वही – एक पेन’ साहित्य वाटप करण्यात आले. ॲड. महेंद्र ब्राह्मणे व सुनील हेलोडे यांनी हे साहित्य प्रदान केले. यावेळी तोंडे सर, वासुदेव दाभाडे, भिकाजी गव्हादे, यशवंत लोखंडे, रमेश उमाळे, देवानंद जी शेजव, बंटी भाऊ रोकडे, सुनीता बाई शेजव, निर्मला बाई शेजव, संजीवनी शिरस्कार, राजू भाऊ खंडेराव, शेख राजिक, शेख बाबू यांची उपस्थिती होती.

मंडळाचे उपाध्यक्ष विनोद शेजव, शेषराव गव्हादे, अतुल दाभाडे, संदीप दाभाडे, प्रदीप शेजव, अमरदीप शेजव, सागर शेजव, सागर खंडेराव, शुभम शेजव, अमोल शेजव, आनंद शेजव, धुरंदर, हिंमत शेजव, दिलीप शेजव यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम सफल केला.


कार्यक्रमाचा उद्देश

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षणाच्या विचारांचा प्रसार करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात प्रेरित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता. फक्त सकाळी–सायंकाळी महापुरुषांना हार अर्पण करून फोटो काढण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे कार्य प्रत्यक्षात अंगीकारणे हीच खरी आदरांजली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




Post a Comment

0 Comments