वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
आनंदा भालेराव
टिटवाळा महोत्सव 2025 अंतर्गत, आदरणीय आयु. विजय (भाऊ) मारुती देशेकर – जनसेवक, मांडा–टिटवाळा विभाग यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 04 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून दि. 06 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यंदाच्या उपक्रमात डीजे, नृत्य किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना पूर्णतः वगळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या विचारांवर आधारित भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. समाजप्रबोधनावर आधारलेला हा उपक्रम उपस्थितांनीही कौतुकास्पद ठरवला.
या स्पर्धेत ॲड. सागर वाकळे यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा भारत" या विषयावर प्रभावी आणि प्रेरणादायी व्याख्यान दिले. न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव त्यांनी प्रभावी शब्दांत उपस्थितांपर्यंत पोहोचवली. संविधानिक मूल्यांचा जागर पुन्हा एकदा सर्वांना करून देत त्यांनी तरुण पिढीत नवी ऊर्जा निर्माण केली.
मनोरंजनापेक्षा विचारांना प्राधान्य देत टिटवाळा महोत्सव समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आणि अर्थपूर्ण आदरांजली अर्पण केली.
🌹 जयभीम | जय महाराष्ट्र | जय संविधान


Post a Comment
0 Comments