Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे आलेल्या दानराशीची मोजणी; पदाधिकाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

मुंबई

द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष व WBF चे उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनानुसार महामानव, प्रज्ञावंत, क्रांतीसूर्य, ज्ञानाचे अथांग महासागर भारताचे भाग्यविधाते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर संपूर्ण विश्वातून धम्म अनुयायी विनम्र अभिवादनासाठी उपस्थित राहतात.


या प्रसंगी धम्म अनुयायांकडून श्रद्धेने आर्थिक दान व धम्मदान अर्पण करण्यात आले. सदर दानराशीची मोजणी करण्यासाठी गुरुवार, दिनांक 18/12/2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत राज्य पदाधिकारी तसेच मुंबई व ठाणे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.


या मोजणी प्रक्रियेत पुढील पदाधिकारी उपस्थित राहिले—

1. आयु. बुधाजी वाढविंदे

2. आयु. हेमंत जी. जाधव

3. आयु. मुकेश कांबळे

4. आयु. अक्षय जे. शिर्के

5. आयु. संदिप कांबळे

6. आयु. भगवान गरुड

7. आयु. गुलाब खंदारे

8. आयु. अक्षय इंगळे

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आर्थिक दानातून आलेली संपूर्ण रक्कम मोजून ती कोर्ट रिसीव्हर विभागाकडे सुपूर्द केली. या पारदर्शक व जबाबदारीपूर्ण कार्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


तसेच दि. 15, 16 व 17 डिसेंबर 2025 रोजी मोजणी व व्यवस्थापनासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचेही संस्थेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments