वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
आनंदा भालेराव
मुंबई :काॅ. वेणु पी. नायर, महामंत्री यांच्या खंबीर नेतृत्वाखाली एन. आर. एम. यु. (NRMU) मुंबई मंडळ – इंजिनियर विभाग यांच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मास लिव्ह घरणा आयोजित करण्यात आला होता.
या आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबई मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी विविध इंजिनियर डेपोमध्ये प्रत्यक्ष भेटी देत सभा व बैठका घेतल्या. यामध्ये कामगारांच्या सुरक्षा, संरक्षण व पदोन्नती यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.
या तीव्र आंदोलनात्मक भूमिकेमुळे प्रशासन जागरूक झाले असून, त्याचाच परिणाम म्हणून दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी प्रशासनाने तातडीची (अर्जंट) बैठक आयोजित केली. सदर बैठकीत कामगारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
या चर्चेत किमान 70 टक्के मुद्द्यांवर प्रशासनाकडून लेखी/तोंडी आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी 70 ते 80 इंजिनियर विभागातील कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती.
या बैठकीस काॅ. सचिन नायर (सचिव, मुंबई मंडळ), काॅ. अमित भगत (सहाय्यक महामंत्री, मुख्यालय) यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
अखेर आंदोलनास यश मिळाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,
“काॅ. वेणु पी. नायर जिंदाबाद, मध्य रेल्वे/कोकण रेल्वे जिंदाबाद, NRMU जिंदाबाद, इंजिनियर युनिटी जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.



Post a Comment
0 Comments