वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सोशल मीडिया संपादक मोहन दीपके
फलटण (जि. सातारा) :नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गीते यांनी फलटण येथील निकोप हॉस्पिटलला भेट देऊन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जे. टी. पोळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी हॉस्पिटलमार्फत गोरगरिबांना मिळणाऱ्या विविध शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती घेण्यात आली.
या भेटीदरम्यान धर्मादाय योजनेअंतर्गत तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, उपचारांची गुणवत्ता आणि अंमलबजावणी यावर सखोल चर्चा झाली. सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत व दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही संवाद साधण्यात आला.
यावेळी डॉ. जे. टी. पोळ यांनी धर्मादाय योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा व उपचार उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच अनेक रुग्णांनी या योजनांमधून प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याची माहिती राज्य सचिव वैभव गीते यांना दिली.
NDMJ संघटनेच्या वतीने राज्यभर सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन स्तरावर, जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. फलटण तालुक्यातील दुर्बल व वंचित घटकांच्या वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरे राबविणे तसेच आरोग्यविषयक योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावर डॉ. पोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महिन्यातून दोन वेळा मोफत आरोग्य शिबिरे राबविण्यात येतील, असे जाहीर केले. या भेटीप्रसंगी गोविंद मोरे, सचिन मोरे, राजकुमार काकडे, जय भैय्या माने, सुनील कांबळे, प्रणव भागवत, प्रबुद्ध गायकवाड आदी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments