![]() |
| सामाजिक कार्याची उंची वाढवणारे नेतृत्व : डॉ. रविंद्र घोसाळे |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
{संपादकीय}
हातकणंगले (कोल्हापूर) — महाराष्ट्र राज्य दहावी युवा धम्म परिषद 18 जानेवारी 2026 रोजी हातकणंगले येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असून, या परिषदेत संगमनेर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तेजस फाउंडेशनचे अध्यक्ष, फुले–शाहू–आंबेडकर विचारांचे प्रभावी युवा नेतृत्व डॉ. रविंद्र घोसाळे यांना मानाचा भन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. रविंद्र घोसाळे यांनी सामाजिक, शैक्षणिक, युवक प्रबोधन तसेच वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी व दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या या भरीव व उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समाजपरिवर्तनाच्या कार्यात सातत्य, निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि युवा पिढीला संविधानिक मूल्यांची जाणीव करून देण्याचे कार्य हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात गौरवाची भर पडली आहे.


Post a Comment
0 Comments