वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
ठाणे जिल्हा संपादक - शंकर गायकवाड
शहापूर : महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त रायझिंग डे उपक्रमांतर्गत शहापूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने नशामुक्ती व सायबर जनजागृती विषयावर प्रभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जोजले कॉलेज, आसनगाव ते शहापूर बाजारपेठ दरम्यान प्रभातफेरी काढण्यात आली.
या प्रभातफेरीत शहापूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, जोजले कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. प्रभातफेरीदरम्यान नशामुक्तीचे संदेश, सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत जनजागृती फलक व घोषणांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाद्वारे तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सायबर फसवणूक, ऑनलाईन सुरक्षितता, सोशल मीडियाचा जबाबदार वापर याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Post a Comment
0 Comments