![]() |
| काजल पगारे यांची महिला संघटकपदी निवड, मुंबईत अभिनंदन व सत्कार सोहळा. |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
संपादकीय
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे, संपूर्ण नातेवाईकांचे आशीर्वाद तसेच राष्ट्रीय नेते व खासदार आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि ठाणे प्रदेश अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने श्रीमती काजल आत्माराम पगारे यांची बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या महिला संघटकपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कार्यालय, बृहन्मुंबई येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या काजल पगारे या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व कर्मचारी हितासाठी सदैव आग्रही राहणाऱ्या अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभवासह सामाजिक बांधिलकीची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
या नियुक्तीमुळे महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या, हक्क, न्याय व सन्मानासाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि संघटनेला नवे बळ देण्यासाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
श्रीमती काजल पगारे यांच्या या यशाबद्दल विविध कर्मचारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी व सहकारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.




Post a Comment
0 Comments