प्रतिनिधी : बाळकृष्ण सोनवणे
उंभ्रई (शहापूर) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंभ्रई येथे भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत आनंदात शिस्तबद्ध व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,पाहुणे,गावकरी,पालक वर्ग तसेच शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उंभ्रई गावातील इयत्ता बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली विद्यार्थिनी कुमारी. कल्याणी किशोर चौधरी हिच्या शुभ असते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध कवयात संचालन सादर करून उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री.किरण हुमणे हे होते.शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल आपली भाषणे सादर केली मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
यानंतर 2006 च्या माजी विद्यार्थ्यांनी व ग्रामपंचायत उंभ्रई यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना कंपास पेटी व खाऊचे वाटप केले या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती यमुनाबाई बारकू भोसले,उपसरपंच विलास चौधरी, ग्रामसेविका रीना राऊत मॅडम,पोलीस पाटील द्वारकानाथ चौधरी,ग्रामपंचायत सदस्य श्रीमती आज्ञा वाढविंदे,श्रीमती.दिशा चौधरी श्री.नितीन वाघ,श्रीमती.छकुली पवार सामाजिक कार्यकर्ते श्री.जगदीश चौधरी, श्री.पंकज चौधरी,श्री.अशोक वाढविंदे, श्री.प्रशांत चौधरी वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज किन्हवली प्रतिनिधी श्री.बाळकृष्ण सोनावणे, श्री.हेमंत वाढविंदे,ग्रामपंचायत शिपाई श्री.बाळकृष्ण रोकडे ग्रामपंचायत कर्मचारी श्री.संतोष चौधरी ग्राम रोजगार सेवक श्री कपिल चौधरी अंगणवाडी मदतनीस श्रीमती.स्वाती रोकडे तसेच महिलावर्ग श्रीमती.विशाखा वाढविंदे, श्रीमती.हर्षदा वाढविंदे, श्रीमती.मानसी वाढविंदे आशा सेविका श्रीमती.सविता चौधरी, श्रीमती.कमल हुमणे यांच्यासह सण 2006 चे माजी विद्यार्थी यांची संपूर्ण टीम महेश चौधरी,,रितेश चौधरी,दिनेश गायकवाड,समीर चौधरी,हर्षल दिनकरराव,तुषार चौधरी,,आदित्य वाढविंदे,तुषार राऊत,निलेश चौधरी, तसेच ग्रामस्थ,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री भास्कर धानके सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आलेल्या मान्यवरांचे पाहुण्यांचे ग्रामस्थ पालक वर्ग यांचे शब्द सुमनाने स्वागत करून त्यांचे आभार मानले तसेच सहशिक्षक शिर्के सर व सहशिक्षिका देशमुख मॅडम, शिर्के मॅडम यांनी कार्यक्रमास मोलाचे योगदान दिले अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध नियमबद्ध व प्रेरणात्मक देशभक्तीच्या वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.



Post a Comment
0 Comments