Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*गाथा रमाई मातेची या लेखक माणिकराव देठे गुरुजी लिखित दीर्घ काव्याचे प्रकाशन हॉटेल जय लीला नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.*

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

प्रतिनिधी : मोहन दिपके

प्रथम त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बा.णा धांडोरे साहित्यिक, प्रमुख पाहुणे संभाजी सावंत निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेखा भालेराव, पत्रकार बी.टी शिवशरण,डॉ. पांडुरंग नलावडे,भारत गायकवाड,प्रा.शिवाजी वाघमारे,विकास दादा धाईंजे हे उपस्थित होते.

यावेळी लेखक माणिकराव देठे गुरुजी यांनी माता रमाई यांच्या जीवनावरील दीर्घ काव्य लिहिण्याचे पार्श्वभूमी व दीर्घ काव्याचे महत्व अधोरेखित केले. जयपालजी देठे (IFS)इंडियन फॉरेन सर्व्हिस यांनी त्यांचे वडिल व या दीर्घ काव्याचे लेखक माणिकरावजी देठे यांच्या जीवन प्रवासातील महत्त्वाच्या घडामोडींचा उलघडा केला.

सूत्रसंचालन प्रकाश साळवे यांनी केले.

माता रमाई यांच्या जीवनावरील हे दीर्घ काव्य अतिशय दर्जेदार असून येणाऱ्या पिढीकरिता दिशा दर्शक आहे. वयाच्या सत्तरी मध्ये लेखक माणिकरावजी देठे गुरुजी यांनी प्रचंड अभ्यासाअंती हे दीर्घ काव्य लिहिले आहे.


यावेळी फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच संपूर्ण देठे परिवार व नातेवाईक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

.

वैभव जी गीते साहेब 

राज्यसचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस .


 

Post a Comment

0 Comments