Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळाची डिव्हिजनल काॅन्सिल बैठक संपन्न.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : आनंद भालेराव

मुंबई : ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळाची डिव्हिजनल काॅन्सिल बैठक आज दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता एन.आर.एम.यु. कल्याण मेन शाखेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली.


काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री – मध्य रेल्वे, कोकण रेल्वे) यांच्या आदेशानुसार आणि काॅ. व्ही. आनंदन (महामंत्री) तसेच काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीत काॅ. वसंत कासार (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, मुंबई मंडळ) व काॅ. अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष, मुंबई मंडळ) यांनी आपले विचार व्यक्त केले. सेवानिवृत्त कामगारांच्या विविध अडचणी, डिव्हिजनल रेल्वे दवाखान्याशी संबंधित प्रश्न, आठवे वेतन आयोग, नॅशनल इन्क्रिमेंट, पास सुविधा आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


मुंबई मंडळाने आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा काॅ. आनंदा भालेराव (सचिव, मुंबई मंडळ) यांनी सभेपुढे मांडला. सदर आढाव्यास सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली.


बैठकीच्या शेवटी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजीतदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बैठक समाप्त करण्यात आली.

काॅ. वेणु पी. नायर महामंत्री जीके लाल सलाम, एन.आर.एम.यु. जिंदाबाद, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद,




Post a Comment

0 Comments