Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरोली येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 


प्रतिनिधी : शंकर गायकवाड

सावरोली (ता.शहापूर) :

आज दिनांक २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावरोली येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत शिस्तबद्ध व शासकीय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मान्यवर पाहुणे, ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सावरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. जयवंत शंकर दवणे (जीवन बाबा) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व देखणे कवायत संचालन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गणेश भाऊ केदार हे होते. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


यानंतर शाळेच्या इमारतीसाठी सुमारे 20 वर्षांपूर्वी आपल्या मालकीची जागा दान करणाऱ्या कै. शिवाजी दवणे यांच्या पत्नी ग भा पुष्पा शिवाजी दवणे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने कै. शिवाजी दवणे यांच्या नावाची नामकरण पाटी बसविण्यात आली.

या उपक्रमासाठी डॉ. गंगाराम ढमके सर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून नामकरण पाटी तयार करून दिली. या नामकरण पाटीचे अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गणेश केदार व महाराष्ट्र वृत्तरत्न न्यूजचे ठाणे जिल्हा संपादक श्री. शंकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. मधुकर निरगुडा, ग्रामसेविका राऊत मॅडम, पोलीस पाटील श्री. भगवान दवणे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुवर्णा दवणे, श्री. गजानन धनगर, श्री. जगदीश दवणे, श्री. मोहन धनगर, श्री. जितेंद्र दवणे, श्री. सलाम शेख, श्री. महेंद्र गायकवाड, श्री योगेश दवणे श्रीमती शेखताई यांच्यासह ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.



Post a Comment

0 Comments