प्रतिनिधी : शंकर गायकवाड
अकोला: भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्सव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य सोहळा पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पार पडला, जिथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून संविधानाचा जयघोष करण्यात आला.
पक्षाच्या कार्यालयासोबतच अकोल्यातील ऐतिहासिक अशोक वाटिका येथेही ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीताचे गायन करत तिरंग्याला सलामी दिली.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये
मिलिंद इंगळे (जिल्हा महासचिव),
आम्रपाली खंदारे (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), किशोर जामानिक (तालुका अध्यक्ष), सुभाष रौंदळे (माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष), मोहन तायडे (प्रसिद्धी प्रमुख),
याशिवाय गजानन गवई, विकास सदांशिव, संजय बुधे, सुयोग आठवले, प्रदीप शिरसाट, उत्तमराव खंडारे, संतोष कीर्तक, सतीश चोपडे, चंद्रकांत पाटील, गणेश बुटे, दिलीप शिरसाट, राजेश मोरे यांसह इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
देशाचे संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचा निर्धार करत हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments