Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वयंसिध्द शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे चे वाटप*



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : मोहन दीपके

मौजे डिग्रस कऱ्हाळे, ता. जि. हिंगोली येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये २६ जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.


ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व देशभक्तीपर उपक्रम सादर करत प्रभात फेरी काढली. ही प्रभात फेरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेली. तेथे दोन्ही महापुरुषांना मानवंदना अर्पण करून प्रभात फेरी पुन्हा शाळेच्या दिशेने परत आली.

या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वयंसिद्ध शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, डिग्रस (क) यांच्या वतीने इयत्ता पहिली ते पाचवीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास स्वयंसिद्ध शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, डिग्रस (क) चे अध्यक्ष करण रोहिदास कुऱ्हे, सचिव धम्मदीप नामदेव कुऱ्हे, शाळा समितीचे अध्यक्ष सुभाषराव कऱ्हाळे, उपाध्यक्ष परमेश्वर कऱ्हाळे, तसेच संतोष कऱ्हाळे, विष्णू कऱ्हाळे, अनिल शेळके, मारुती कऱ्हाळे, शिवाजी कऱ्हाळे, महेश कऱ्हाळे आदी सदस्य उपस्थित होते.

तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डिग्रस (क) चे मुख्याध्यापक किसन शेळके सर, जगन्नाथ कऱ्हाळे सर, विठ्ठल गवळी सर, हनुमान गिराम सर, गजानन हंचाटे सर, रवींद्र थोरात सर, बालाजी केंद्रे सर, तसेच अश्विनी कुरुंदकर मॅडम, मीना गुंडुरे मॅडम, चित्रकला मोरे मॅडम, अंजली माने मॅडम, वसुंधरा सोनवणे मॅडम यांची उपस्थिती होती.


सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.



Post a Comment

0 Comments