वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : रितेश साबळे
१५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढत असून फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेच्या मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, प्रत्येक फुले-शाहू-आंबेडकरवादी मतदाराने जर स्वतःसोबत अजून एक मतदार मतदानासाठी प्रेरित केला, तर दोन मते निश्चित होतील. अशा पद्धतीने प्रत्येकाने एक-एक मत जोडले, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील.
समाजातील वंचित, उपेक्षित आणि बहुजन घटकांचे प्रश्न विधानसभेत व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला बळकट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केवळ स्वतः मतदान करून थांबू नये, तर कुटुंबातील, शेजारील व मित्रपरिवारातील मतदारांनाही मतदानासाठी बाहेर काढावे, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक प्रश्नांची नसून सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्ये मजबूत करण्याची संधी असल्याचे नमूद करत, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.


Post a Comment
0 Comments