वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : रितेश साबळे
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची ब्रीजवाडी येथे जाहीर सभा पार पडली. प्रभाग क्रमांक ९ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश पट्टेकर, शबनम कलीम कुरेशी, शहनाज सलीम पटेल व कलीम छोटू कुरेशी यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत बोलताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी औरंगाबाद शहराच्या स्थानिक विकासासाठी, तसेच नागरी मूलभूत सोयी-सुविधा सक्षमपणे राबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ यांनीही उपस्थितांना संबोधित करत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.




Post a Comment
0 Comments