वृत्तरत्न नाव महाराष्ट्र न्यूज
आनंदा भालेराव
शहापूर —दिनांक 06 जानेवारी 2026 रोजी आर. एस. दमानिया इंग्लिश मीडियम स्कूल, सावरोली येथे पार पडलेल्या शहापूर तालुका स्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत “छोटा फटाका, बडा धमाका” या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद शाळा वेहलोळी (बौद्ध पाडा), केंद्र खातिवली येथील बालकलाकारांनी आपल्या कलागुणांचा अविस्मरणीय आविष्कार सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लोककला, लोकसंगीत व लोकनृत्य या स्पर्धाप्रकारात शाळेने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत आपल्या सातत्यपूर्ण यशाची हॅट्ट्रिक साधली असून, तालुका पातळीवर आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक व परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली.
या यशामागे केंद्रप्रमुख मा. प्रतिक्षा गायकवाड मॅडम, माजी केंद्रप्रमुख मा. लक्ष्मीकांत परदेशी सर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. रामचंद्र विशे सर, तसेच मा. जाधव सर व मा. वाधचौरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांची मेहनत आणि बौद्ध पाडा ग्रामस्थांचा सक्रिय पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व बालकलाकार, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


Post a Comment
0 Comments