वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी- गणेश आहिरे
वासिंद : गंधार संगीत क्लासचा ११ वा वर्धापनदिन सोहळा येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी वासिंद – गजानन प्लाझा, स्मार्ट पॉईंट समोर (पेट्रोल पंपाच्या बाजूला) सायंकाळी ४ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व कलाक्षेत्रातील नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. गंधार संगीत क्लासच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या संगीत साधनेचे फलित या सोहळ्यात सादर केले जाणार असून गायन, तालवाद्य, व कलाविष्कार यांचा सुरेल संगम रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.
गंधार संगीत क्लासचे संस्थापक अध्यक्ष श्री. अंनता तुकाराम तरणे सर यांनी सर्व संगीतप्रेमी, पालक व नागरिकांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छारूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमात तबला शिक्षक – महेंद्र बाळाराम पारधी यांचे मार्गदर्शन लाभणार असून, सूत्रसंचालन – मनोहर मडके सर करणार आहेत, तसेच ऑक्टोपॅड वादक सागर भोईर असणार.
संगीतप्रेमींनी या सांस्कृतिक पर्वाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. 🎶
![]() |


Post a Comment
0 Comments