Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*गायमुख घाटात पहाटेच ‘अपघातांची साखळी’; घोडबंदर रोडवर वाहतुकीचा श्वास कोंडला*

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

प्रतिनिधी । मनोहर गायकवाड

ठाणे - ठाणे शहराच्या वाहतुकीसाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवर आज सकाळी भीषण अपघाताने खळबळ उडवली. गायमुख घाटातील वळणावर पहाटे सुमारे ७ वाजता एकामागोमाग एक अशा पाच ते सहा वाहनांची समोरासमोर धडक झाली. काही क्षणांतच रस्त्याचे रणांगणात रूपांतर झाले.

अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की अनेक वाहनांचे अक्षरशः अवशेष झाले. काही गाड्या पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज हादरले. मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, सुदैवाने या दुर्घटनेत कोणताही बळी गेला नाही. मात्र काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताचा फटका मात्र हजारो प्रवाशांना बसला. ठाण्याकडून बोरीवली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कार्यालयीन वेळेतच हा अपघात घडल्याने नोकरदार वर्ग, विद्यार्थी व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी रस्ता पूर्णपणे मोकळा होण्यासाठी वेळ लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Post a Comment

0 Comments